वीज नियामक आयोगाने फेटाळले सुब्रतो रथोंचे आरोप

October 16, 2012 11:25 AM0 commentsViews: 4

16 ऑक्टोबर

सुब्रतो रथोंच्या आरोपात तथ्य नाही असं म्हणतं वीज नियामक आयोगाने रथोंचे आरोप फेटाळले आहेत. महानिर्मितीची याचिका जून 2012 मध्ये नियामक आयोगाने फेटाळली होती. महानिर्मितीचे संच काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय नियमानुसार असल्याचा निर्वाळा आयोगाने दिला होता. महानिर्मितीनं हमी दिलेली वीज मिळाली नाही म्हणून महागडी वीज द्यावी लागली, असा खुलासा महापारेषण कंपनीने आयबीएन लोकमतकडे केला आहे. काल सोमवारी महानिर्मितीचे माजी एमडी सुब्रतो रथोंनी सरकारी कंपनीला डावलून खासगी कंपन्यांकडून महागडी वीज खरेदी केल्याचा त्यांचा दावा आहे. 2 रुपये 72 पैसे प्रति युनिट मिळणारी वीज 4 रुपये 10 पैशांनी खरेदी केली. त्यामुळे सरकारला 30 कोटींचा फटका बसला आहे. विशेष म्हणजेय हा सर्व गैरव्यवहार झाला त्यावेळी ऊर्जाखातं अजित पवार यांच्याकडे होतं.

close