इंदू मिलच्या जागेसाठी रिपाइंसोबत भाजपही उतरली रस्त्यावर

October 15, 2012 11:04 AM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेच्या मागणीसाठी आज आरपीआयसोबत भाजपही रस्त्यावर उतरली आहे. आज पासून आरपीआयचे प्रस्तावित जेलभरो आंदोलन सुरू झालंय. 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यातल्या विविध भागात आरपीआय आणि भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र शिवसेना या आंदोलनात सहभागी नाही. आज चेंबूर इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला सुरवात करण्यात आली. 14 ऑक्टोबरपर्यंत इंदू मिलची जागा मिळाली नाही तर आंदोलन छेडू असा असा इशारा रामदास आठवले यांनी दिला होता. या जेलभरोचं नेतृत्व रामदास आठवले आणि विनोद तावाडे हे नेते करत आहेत.

close