सुनील तटकरेंचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

October 13, 2012 3:49 PM0 commentsViews: 10

13 ऑक्टोबर

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात सुनील तटकरे आणि कुटुंबीयांविरोधात सादर केलेल्या याचिकेप्रकरणी सुनील तटकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. किरीट सोमय्या यांनी सादर केलेली याचिका दाखल करुन घेऊ नये असंही त्यांनी या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून म्हटलंय. ही याचिका जनहितार्थ नसून केवळ राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. तटकरे यांचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांचे व्यवहार याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. सोमय्या यांची ही याचिका दाखल करायची की नाही याबद्दल मुंबई हायकोर्ट पुढील सुनावणीत निर्णय देणार आहे. याचप्रकरणात महाराष्ट्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र,अजून राज्य सरकारने याप्रकरणात प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही.

close