अरविंद केजरीवाल यांचे खुर्शीदांवर पुन्हा टीकास्त्र

October 15, 2012 11:44 AM0 commentsViews: 4

15 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील टीका सुरुच ठेवली आहे. आता हे आंदोलन खुर्शीद यांचा मतदारसंघातून चालवण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. 1 नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशातल्या फारुखाबादमधून आता आंदोलन सुरू करू असंही केजरीवाल यांनी म्हटलंय. सलमान खुर्शीद यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळालेल्या बोगस व्यक्तींना आज केजरीवाल यांनी समोर आणलं. इतकचं नाही तर खुर्शीद यांच्या ट्रस्टच्या मदत मिळालेल्यांच्या यादीत मृत व्यक्तींचाही समावेश असल्याचा धक्कादायक खुलासा केजरीवाल यांनी केला. खुर्शीद यांच्या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सर्वांना मदत दिली गेली अशी टीकाही अरविंद केजरीवाल यांनी केली. दरम्यान, सलमान खुर्शीद यांच्या एनजीओसह उत्तर प्रदेशातल्या अपंगांच्या केंद्रांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या केंद्रांमध्ये निधीचा अपहार झाला का याचा तपास सुरू आहे.

close