‘निळवंडे’च्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा आत्मसमर्पणाचा इशारा

October 16, 2012 2:05 PM0 commentsViews: 5

16 ऑगस्ट

नाशिक-नगर-औरंगाबादचा पाणी प्रश्न आता गुंतागुंतीचा होत चाललाय. प्रवरा नदीतलं पाणी निळवंडे धरणातून जायकवाडीला सोडलं तर त्याच पाण्यात आत्मसमर्पण करू असा इशारा कोपरगावच्या शेतकर्‍यांनी दिली आहे. निळवंडेतलं हे पाणी नाशिक-नगरमार्गे औरंगाबादला देण्याचा शासनाचा निर्णय आहे. कोपरगावमधले बंधारे सध्या पाण्याआभावी कोरडे पडले आहे. जायकवाडीला पाणी सोडताना सोबत कोपरगावसाठीही 1 टीएमसी जादा पाणी सोडावं अशी इथल्या शेतकर्‍यांची मागणी आहे. दरम्यान, मराठवाडयातील जायकवाडी धरणामध्ये निळवंडे धरणातून तात्काळ अडीच टीमसी आदेश मुख्यमंंत्र्यानी शनिवारी दिले होते. मात्र आज चौथा दिवस उजाडला तरी जायकवाडीमध्ये पाणी सोडले नाही. त्यामुळं मराठवडयाला मुख्यमंत्र्यानी धोका दिला आहे असा आरोप औरंगाबादचे खासदार चंद्रकात खैरे यांनी केला आहे.

close