देशोन्नतीचे संपादक पोहरेंना अटकेची शक्यता

October 14, 2012 10:47 AM0 commentsViews: 3

14 ऑक्टोबर

सुरक्षा रक्षकाला गोळीबाराचे आदेश दिले म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. नागपूरमधील गौंडखैरी इथल्या प्रिंटिंग युनिटनधील कामगारांच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. प्रकाश पोहरे आणि त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकाबरोबर आंदोलकांची बाचाबाची झाली. यावेळी पोहरे यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलनकर्त्यांवर 12 बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली त्यातच राजेंद्र दुपारे या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गोळी झाडणार्‍या सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षकाला गोळीबार करण्याचे आदेश दिले म्हणून प्रकाश पोहरेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

close