मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ‘जायकवाडी’ला पाणी सोडले नाहीच

October 15, 2012 2:07 PM0 commentsViews: 10

15 ऑक्टोबर

मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणामध्ये निळवंडे धरणातून तात्काळ अडीच टीमसी आदेश मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिले होते. मात्र आज तिसरा दिवस उजाडला तरी धरणातून पाणी सोडण्याची कोणतीही सूचना संबंधित विभागाला मिळाली नाही. जायकवाडी धरणामध्ये सध्या फक्त 3.5 टक्के इतका पाणीसाठा आहे. इतर धरणामध्येही पाण्याचा साठा खूप कमी आहे. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून पाणी देण्याची मागणी होत होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.

close