केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

October 16, 2012 3:59 PM0 commentsViews: 5

16 ऑक्टोबर

दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे जोरात वाहत आहे आज याचसंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची वेगवेगळी भेट घेतली. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींशी तासभर चर्चा केली. आणि राहुल गांधी यांनीही उद्या राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागितलीय. पितृपक्ष संपलाय आणि नवरात्राला सुरुवात झालीय, त्यामुळे याच आठवड्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी किंवा शनिवारी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. यासाठी काँग्रेस देशातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतेय. पण, पंतप्रधान आणि सोनियांनी राष्ट्रपतींची घेतलेल्या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती देण्यात आलेली नाहीय. तृणमूलच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्या जागी नवे चेहरे घेतले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

close