डोंबिवलीकरांनी घातला रिक्षांवर बहिष्कार

October 14, 2012 11:19 AM0 commentsViews: 7

14 ऑक्टोबर

महागाईच्या खाईत होरपळणार्‍या जनतेला झटका देत रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली. कल्याण डोंबिवलीकरांना 5 रुपयांची दरवाढ फटका बसला आहे. आता या भाडेवाढीविरोधात संतप्त नागरिकांनी रिक्षांवर बहिष्कार घातला आहे. यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी चौकात फलक लावण्यात आले आहे. सध्या नागरिक रिक्षांऐवजी केडीएमसीच्या बसचा वापर करत आहे. एमआयडीसी, पेंढारकर कॉलेज या परिसरात बसेसची संख्या चांगली आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी या भागात बसला प्राधान्य दिलंय. तर अनेक जण चालत जाणं पसंत करतात. त्यामुळे आता नेमकं काय करायचं असा प्रश्न रिक्षा संघटनांना पडला आहे.

close