शेतकर्‍याचा खून प्रकरणी सेनेच्या जिल्हाध्यक्षासह 6 जणांना जन्मठेप

October 15, 2012 2:13 PM0 commentsViews: 6

15 ऑक्टोबर

हिंगोलीत शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे बंधू नगरसेवक श्रीराम बांगर यांच्यासह 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. फेब्रुवारी 2007 साली पारडा गावात विठ्ठल तुकाराम तोडकर या शेतकर्‍याचा शेतीच्या भांडणातून खून झाला होता. या खुनाच्या आरोपात 13 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांचा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. एकूण 11 आरोपी ंपैकी 3 जणांना जिल्हा अतिरिक्त न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सोडलंय. तर आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

close