2011च्या क्रिकेट वर्ल्ड कपवरही प्रश्नचिन्ह

December 1, 2008 12:15 PM0 commentsViews: 1

1 डिसेंबर मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांचा क्रिकेटवर परिणाम तर झालाच आहे. पण आता हा परिणाम दिर्घ काळ राहणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मॅचेस रद्द केल्यानंतर आता 2011चा वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयसीसी वर्ल्ड कप भरवण्यासाठी इतर ठिकाणचे पर्याय शोधत आहे. भारताबरोबरच पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या देशात 2011चा वर्ल्ड कप होणार होता. पण पाकिस्तान आणि आता भारतामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आयसीसी हा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. पुढच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या कार्यकारी अधिका-यांची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. पर्याय म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या नावांचा विचार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 2015 चा वर्ल्ड कप या देशांत होणार आहे.

close