वसई-विरार मॅरेथॉनमध्ये आशिष चौहानने मारली बाजी

October 14, 2012 11:24 AM0 commentsViews: 10

14 ऑक्टोबर

वसई-विरार महापालिकेची दुसरी राष्ट्रीय स्तरावरील महापौर मॅरेथॉन आज आयोजित करण्यात आली होती. हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात आशिष सिंग चौहान तर महिला गटात कविता राऊतनं बाजी मारली. अनेक सेलिब्रिटींनी आज या मॅरेथॉनला हजेरी लावली होती.अभिनेता रितेश देशमुख बरोबर मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकारही या मॅरेथॉनसाठी हजर होते. पण या मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण होता तो ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल विजेता आणि या मॅरेथॉनचा ब्रँड ऍम्बेसेडर सुशील कुमार..जवळपास 10 हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

close