शरद पवारांनी मिळवून दिल्या लवासाला परवानग्या -सिंग

October 18, 2012 1:17 PM0 commentsViews: 47

18 ऑक्टोबर

सामाजिक कार्यकर्ते वाय. पी. सिंग यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार आरोप केलेत. राज्य सरकारने कृष्णा खोरेची 348 एकर जमीन कवडीमोल दरानं लवासाला दिली. त्यात सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा फायदा झाला. लवासाला सर्व परवानग्या मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं वजन वापरलं असा आरोप वाय पी सिंग यांनी केलाय. तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणून हे काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे लेकसिटी कॉर्पोरेशनमध्ये शेअर होल्डर्स आहे. याच लेकसिटी कॉर्पोरेशनला जवळपास फुकटात जमीन दिल्या आहे. ज्यावेली कृष्णा खोर्‍याच्या जमिनी हस्तांतर केलं त्यावेळी नारायण राणे महसूलमंत्री होते. राणेंनी जमिनीचा लिलाव करण्याचं आश्वासन पाळलं नाही त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात सुप्रिया सुळेंना मोठा फायदा झाला असा आरोपही सिंग यांनी केला. मात्र शरद पवार यांनी वाय.पी.सिंग यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

close