औषध विक्रेत्यांचा प्रस्तावित ‘बंद’ मागे

October 15, 2012 3:11 PM0 commentsViews: 7

15 ऑक्टोबर

राज्यातल्या औषधविक्रेत्यांचा प्रस्तावित 'बंद' मागे घेण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशननं हा निर्णय घेतला. केमिस्टच्या मागण्यांबाबत विचार करण्याचं आश्वासन सतेज पाटील यांनी दिलंय. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)च्या जाचक अटींच्या विरोधात आज मध्यरात्रीपासून 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस बंद पुकारला जाणार होता. या काळात एक गोळीसुध्दा विकणार नसल्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला होता. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होणार होती. काहीदिवसांपुर्वी स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरण उघड झाल्यामुळे एफडीएने धडक कारवाई करत 35 केमिस्टविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि 2100 जणांना नोटीस बजावली. त्यामुळे संतप्त झालेल्या केमिस्ट संघटनेनं बंदचं हत्यार उपसले होते. मात्र राज्यसरकारने वेळीच तातडीने बैठक घेऊन हा बंद टाळला आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

close