खराब कोळसामुळे राज्य सरकारला कोट्यवधींचा फटका

October 16, 2012 5:20 PM0 commentsViews: 6

16 ऑक्टोबर

राखेचं प्रमाण जास्त असलेल्या कच्च्या कोळशाचा वापर केल्यामुळे महाजनकोचं म्हणजेचं महानिर्मितीचं मोठं नुकसान होतंय. हीच बाब महानिर्मितीचे माजी एम डी सुब्रतो रथो यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये मांडली आहे.

महाराष्ट्रातल्या सात वीज प्रकल्पांसाठी दरवर्षी सुमारे 380 टन कोळसा लागतो. हा कोळसा वॉशरीजमार्फत खरेदी केला जात होता. पण, फेब्रुवारी 2011 मध्ये ऊर्जा खात्यानं अचानक वॉशरीजचा कोळसा बंद करून कच्चा कोळसा घेण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2011 ते जानेवारी 2012 या नऊ महिन्यांच्या काळात कच्चा कोळसा वापरल्यामुळे महानिर्मितीकडून साडेेचार हजार युनिट कमी वीजनिर्मिती झाली. त्यामुळे खाजगी वितकरांकडून महागडी वीज खरेदी करावी लागली. अशी तक्रार सुब्रतो रथो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आयबीएन लोकमतच्या हाती सुब्रतो रथो यांनी सादर केलेला महाजनकोचा स्टेटस रिपोर्ट लागलाय. त्यामध्ये निकृष्ट दर्जाची कच्चा कोळशाची खरेदी आणि वाहतूक तसंच वॉशरीचे कंत्राटं याबाबतच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवण्यात आलंय. सुब्रतो रथो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ऊर्जा खात्यामध्ये चाललेल्या बनवेगिरीचा पर्दाफाश केला होता. त्याच पत्राबरोबर रथो यांनी महाजनकोचा स्टेटस रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला होता.

close