खुर्शीदांनी दिली केजरीवालांना धमकी

October 17, 2012 9:55 AM0 commentsViews: 6

17 ऑक्टोबर

कायदामंत्री सलमान खुर्शीद आणि अरविंद केजरीवाल यांचे आरोप-प्रत्यारोप आता मुद्यावरुन गुद्यावर आले आहे. आज चक्क देशाचे कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी थेट अरविंद केजरीवाल यांना धमकी दिली आहे. केजरीवाल यांनी फारुखाबादमध्ये यावं, पण परतही जाऊन दाखवावं अशी धमकी खुर्शीदांनी दिली. तसेच माझ्या हातात अनेक वर्षांपासून पेन आहे, पण आता शाईची जागा रक्तानं घेण्याची वेळ आलीय असं खळबळजनक विधान त्यांनी केलं. खुर्शीद म्हणाले,'बहोत दिनसे कलम मेरे हाथमे थामकर मुझसे कहा था…अब कलमसेही काम करो…मुझे वकिलोंका मंत्रि बना दिया….मुझे लॉ मिनिस्टर बना दिया और कहा कलम से काम करो. करुंगा कलम से काम, लेकीन लहू से भी काम करुंगा.. आईये फरुखाबाद लेकीन लौट कर भी आईये फरुखाबाद से…वो बात ये करते है की हम सवाल पूछेंगे, तुम जवाब देना. हम कहते है की जवाब सुनो..और सवाल पुछना भूल जाओ. – सलमान खुर्शीद

close