इंग्लंड टीम भारतात येणार

December 1, 2008 12:48 PM0 commentsViews: 6

1 डिसेंबर क्रिकेट फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माघारी परतलेली इंग्लंड टीम टेस्ट मॅच खेळायला भारतात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 डिसेंबरला टीम भारतात येईल. पहिली सराव मॅच बडोद्याच्या ऐवजी मोहालीत खेळवण्यात येणार आहे. तसंच अहमदाबादला होणारी पहिली टेस्टही मोहालीत खेळवली जाणार आहे. दुसरी टेस्ट मॅच याआधीच मुंबई ऐवजी चेन्नईत हलवण्यात आली होती. बीसीसीआयने इंग्लंड टीमला पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली आहे. टेस्ट सीरिज या महिन्याच्या 11 तारखेपासून सुरू होणार असून पहिली सराव मॅच 5 तारखेला मोहालीत होईल.

close