पुरावे असतील तर कोर्टात जा -नारायण राणे

October 19, 2012 10:16 AM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर

वाय.पी.सिंग यांचे आरोप बिनबुडाचे आहे त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सरळ कोर्टात जावं असं जाहीर आव्हान नारायण राणे यांनी सिंग यांनी दिले. लवासासाठी कमी किंमतीत जमिनी दिल्या गेल्या तसंच या अनियमितता केली गेली, असे आरोप काल वाय.पी. सिंग यांनी केले होते. पण नारायण राणे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सगळं काही कायद्याप्रमाणे झालं आहे, तसेच लवासामधील अनियमितता दुरूस्त करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्या दुरूस्त करण्यात आल्या असंही राणेंनी स्पष्ट केलंय.

close