अखेर श्वेतपत्रिकेचं काम शिर्केंकडून काढून घेतलं

October 15, 2012 5:14 PM0 commentsViews: 11

15 ऑक्टोबर

विदर्भ सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले डी. पी. शिर्के यांचं जलसंपदा खात्याचं सचिवपद काढून घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश काढून शिर्के यांना बिनपदाचे अधिकारी बनवलंय. शिर्केंककडे सोपवलेली सिंचन श्वेतपत्रिकेची जबाबदारीही काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे असलेलं लाभक्षेत्र कक्षाचं सचिवपद व्ही. गिरीराज या आयएस अधिकार्‍याकडे सोपवण्यात आलंय. गिरीराज सध्या रोहयोचे सचिव आहेत. त्यांच्यानिमित्तानं जलसंपदा खात्यात पहिल्यांदाच आयएएस अधिकार्‍याची नियुक्ती झालीय. डी. पी. शिर्केंचं पद काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांची विभागीय चौकशी मात्र सुरूच राहणार आहे. गेल्या 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी शिर्के यांच्यासह 45 अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

close