केजरीवाल करणार आज नवा गौप्यस्फोट

October 17, 2012 10:09 AM0 commentsViews: 1

17 ऑक्टोबर

रॉबर्ट वडरा आणि सलमान खुर्शीद यांच्यानंतर आज अरविंद केजरीवाल आणखी एक नवा गौप्यस्फोट करणार आहेत. आणि यावेळी त्यांचं टार्गेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसही केजरीवाल यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रॉबर्ट वडरा, सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल कोणाचा घोटाळा बाहेर काढणार याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल नवा गौप्यस्फोट करणार आहेत.

close