निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी आज सोडणार पाणी

October 19, 2012 10:21 AM0 commentsViews: 61

19 ऑक्टोबर

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून मराठवाड्यासाठी आज संध्याकाळी पाणी सोडलं जाणार आहे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी आज ही घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील प्रवरा नदीवर हे धरण आहे. या धरणातील पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात येणार आहे. औरंगाबादला पाणी पुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणात फक्त 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र श्रीरामपूर मधल्या शेतकर्‍यांचा याला विरोध असल्याने तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आधी आमच्या कालव्याना पाणी द्यावं मग मराठवाड्याला पाणी द्यावं अशी भूमिका या शेतकर्‍यांनी घेतली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांनी औरंगाबादला पाणी देण्यास विरोध केला. नाशिक जिल्हा पाणी प्रश्न कृती समितीतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात पाणी परिषद घेण्यात आली. यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. गंगापूर धरणात कमी पाणी असताना ते जायकवाडीसाठी देण्याच्या शासनाच्या विचाराचा यावेळी निषेध करण्यात आला. गंगापूर धरणातलं पाणी जायकवाडीसाठी सोडलं तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

close