डोन्ट वरी, पेट्रोल पंप 24 तास सुरु राहणार

October 16, 2012 9:42 AM0 commentsViews: 24

16 ऑगस्ट

लाखो वाहनधारकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आता पेट्रोल पंप सर्व शिफ्टमध्ये सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय पेट्रोल पंप मालक-चालक संघटनेनं घेतला होता. पण पेट्रोल पंप चालकांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. काल रविवारी नवी दिल्लीत तेल कंपन्यांसोबतची चर्चा यशस्वी झाल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी आपला निर्णय बदलला आहे. पेट्रोल पंपचालकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचे संकेत कालच्या चर्चेत मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सोमवारी एक दिवसाच्या शिफ्टमुळे वाहनधारकांचे हाल झाले. लांबपल्ल्याचा प्रवास करण्यार्‍या अनेक वाहनधारकांना याचा चांगलाच फटका बसला.

close