जेठमलानींचा भाजपला घरचा अहेर,गडकरींविरोधात पुरावे देऊ !

October 17, 2012 10:19 AM0 commentsViews: 4

17 ऑक्टोबर

भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणलंय. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना अडचणीत आणणारं विधान त्यांनी सीएनएन-आयबीएनशी बोलताना केलंय. केजरीवाल यांनी गडकरींविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले तर आपण केजरीवाल यांना पाठिंबा देऊ असा अहेर जेठमलानींनी भाजपला दिला. इतकंच नाही तर आपणही गडकरींच्या विरोधात आणखी पुरावे सादर करू, असंही जेठमलानी यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबाही दिला. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या वेळी त्यांनी नितीन गडकरींना एक पत्र लिहिलं होतं. त्यात नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावं, अशी मागणी त्यांनी केली होती.

close