अण्णांची 100 सदस्यांची नवी टीम

October 19, 2012 12:09 PM0 commentsViews: 7

19 ऑक्टोबर

अण्णा हजारे यांनी टीम अण्णा बरखास्त केल्यानंतर आता नव्याने आपली टीम तयार करत आहे. अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची घोषणा करून वेगळ्या मार्गाने निघाले आहे तर अण्णांनी आपली टीम आता स्वबळावर उभारत आहे. या टीममध्ये 100 सदस्य असणार आहेत. प्रत्येक राज्यातून 2 सदस्य या टीममध्ये घेतले जातील. या आंदोलनाचं सर्व काम राळेगणसिद्धीमधून चालणार आहे. अण्णा पुन्हा एकदा भ्रष्टाचारविरोधी नवं आंदोलन छेडणार आहेत. त्यासाठी अण्णा 1 जानेवारीपासून देशव्यापी दौरा करणार आहेत. बिहारची राजधानी पाटण्यातून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.

close