IAC च्या लोकपालमार्फत दमानिया,भूषण आणि गांधींची होणार चौकशी

October 19, 2012 12:28 PM0 commentsViews: 3

19 ऑक्टोबर

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते प्रशांत भूषण, अंजली दमानिया आणि मयांक गांधी यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाले आहे. या आरोपांची चौकशी करू असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शननं अंतर्गत लोकपाल नियुक्त केला आहे. या लोकपालाकडून या तिघांचीही चौकशी होईल असं आएसीनं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, या आरोपांशी संबंधित कागदपत्रं मीडियाला द्यायला दमानिया आणि मयांक गांधी यांनी इन्कार केला आहे. मीडिया ट्रायल नको त्यामुळे ही कागदपत्रं देणार नाही असं या दोघांनी सांगितलं आहे. पण आएसीनं स्थापन केलेल्या लोकपालकडून चौकशीला आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close