दलित महिला हत्येप्रकरणी 3 जणांना अटक, 2 काँन्स्टेबल निलंबित

October 17, 2012 10:28 AM0 commentsViews: 4

17 ऑक्टोबर

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात एका दलित महिलेला चिरडून मारल्याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात ट्रॅक्टरचालकाचाही समावेश आहे. या महिलेचं दुकान चालवणारा आणि आणखी एका आरोपीचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन पोलीस कर्मचार्‍यांनाही निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.

पण मुख्य आरोपी काँग्रेसचा शहराध्यक्ष अब्दुल बाकी अब्दुल करीम हा अजूनही फरार आहे. तर गुन्हा दाखल झालेले सर्व 9 आरोपी हे एकाच कुटुंबातील आहेत. दरम्यान, या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. पण सर्व आरोपींना अटक करण्याचं लेखी आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर या महिलेचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला आहे. निर्मला हनुवते असं या महिलेचं नाव आहे.

अब्दुल करीम हा हिमायतनगर शहर काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्यानं काल भरदिवसा या महिलेची ट्रॅक्टरखाली हत्या केली होती. स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्याच्या वादावरून ही हत्या करण्यात आली. अब्दुलपासून जीवाला धोका असल्याची तक्रार महिलेनं आदल्याच दिवशी पोलिसांकडे केली होती. पण पोलीसांकडून या तक्रारीला दाद मिळाली नाही. काल संध्याकाळी ही महिला आपल्या घरी परतत असताना अब्दुलनं तिला ट्रॅक्टरच्या धडकेने आधी खाली पाडलं आणि नंतर तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टर चालवला.

close