सचिनला ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चा किताब

October 16, 2012 10:17 AM0 commentsViews: 3

16 ऑक्टोबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन सरकारचा मानाचा 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा किताब सचिनला दिला जाणार आहे. याबद्दलची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी केली आहे. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियातील मानाचा नागरी किताब आहे आणि क्वचितच ऑस्ट्रेलिया बाहेरील व्यक्तींना हा किताब प्रदान केला जातो. आतापर्यंत फक्त दोन भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचे कॅबिनेट मंत्री साइमन क्रिन लवकरच भारताच्या दौर्‍यावर येणार आहे. यावेळी सचिनला 'एएम' नावाने ओळखल्या जाणारा हा विशेष सन्मान दिला जाण्याची शक्यता आहे. सचिनने आजपर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने हा किताब जाहीर केला आहे. सचिन सध्या दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन लीग टी-20 साठी मुंबई इंडियनकडून खेळत आहे. शतकांचा शतकवीर सचिनने 190 टेस्ट मॅचमध्ये 15,533 रन्स केले आहे. या व्यतिरिक्त सचिनच्या नावावर 463 एकदिवशीय आंतराष्ट्रीय सामन्यात 18,426 रन्स जमा आहे.

close