पुणे महापालिकेचं विभाजन करा – निलम गोर्‍हे

October 19, 2012 12:50 PM0 commentsViews: 25

19 ऑक्टोबर

पुणे महापालिकेत 28 गावांचा समावेश झाल्यानं पुणे महापालिका ही सर्वात मोठं क्षेत्रफळ असणारी महापालिका झालेली आहे. त्यामुळे इथल्या सोयीसुविधांवरही ताण वाढला आहे. त्यासाठी महापालिकेचं विभाजन करावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गोर्‍हे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही सूचनावजा मागणी केली आहे. काल गुरुवारी पुण्याजवळच्या 28 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातली अधिसूचना नगरविकास विभागानं जारी केली आहे. 1997 साली 18 गावांचा समावेश करण्यात आला होता. पण 2003 ला ही गावं पुन्हा पुणे महापालिकेतून वगळण्यात आली. पण आता 28 गावांचा पुन्हा समावेश केल्यानं पाणी तसंच इतर सुविधांवर ताण पडेल म्हणून राष्ट्रवादी वगळता इतर सर्व प्रमुख पक्षांचा याला विरोध केला आहे. याशिवाय जुन्या गावांचा रखडलेला विकास आराखडाही शहर सुधारणा समितीनं मंजूर केला.

close