पुणे पालिकेचा हॉर्डिंगच्या नवा दराचा निर्णय वादात

October 22, 2012 10:43 AM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

पुणे महानगरपालिकेचा स्थायी समितीने होर्डिंग जाहिरातीचा दर कमी करण्याचा निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने होर्डिंग जाहिरातीचा दर 222 रूपये प्रती चौरस फूट वरून कमी करून 41 रूपये 33 पैसे प्रती चौरस फूट असा केला आहे. स्थायी समितीच्या या निर्णयामुळे महापालिकेला दर वर्षी 90 कोटी रूपयाचा तोटा होणार आहे असा आरोप काही नेत्यांनी केलाय. पालिकेच्या स्थायी समितीने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून या निर्णया विरोधात मुख्यमंत्री किंवा कोर्टात दादा मागणार असल्याचा काँग्रेसच्या नेत्याच म्हणणं आहे. मात्र स्थायी समितीच्या निर्णय योग्य असून यामुळे पालिकेचा कोणतच नुकसान होणार नसल्याच स्थायी समितीच्या अध्यक्षाच म्हणणं आहे.

close