गडकरींनी लाटल्या शेतकर्‍यांच्या जमिनी -केजरीवाल

October 17, 2012 1:24 PM0 commentsViews: 11

17 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरींनी स्वत:च्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या असून यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मदत केली आहे. गडकरींचा सिंचन घोटाळ्यातही सहभाग असल्याचा घणाघाती आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच नितीन गडकरींचे 5 वीज प्रकल्प आणि 3 साखर कारखाने असून यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी तर बळकावल्याच त्याचबरोबर शेतीचं पाणीही वळवलं असा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. मात्र नितिन गडकरींनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरा, कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर आरोपस्त्र सोडल्यानंतर केजरीवाल यांनी आपला मोर्चा विरोधीपक्षाकडे वळवला. गेल्या पंधरा दिवसांपासून एक नवा गौप्यस्फोट करणार असं सांगून केजरीवाल यांनी वातावरण तापवलं होतं. पण हा गौप्यस्फोट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या संदर्भात असणार असल्याचा केजरीवाल यांच्या सहकारी अंजली दमानिया यांनी 'लिक' केल्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. आणि आज ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांनी पुराव्यानिशी टीकास्त्र सोडले. नितिन गडकरींचे राज्यात सगळ्यात मोठे उद्योग साम्राज्य आहे.

राज्यात गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्यात गडकरींचा सहभाग आहे. त्यांनी आपला पदाचा गैरवापर करत शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या आहे. 2000 मध्ये उमरेड धरणासाठी जमिनी न वापरल्यामुळे शेतकर्‍यांनी त्या परत मागितल्या होत्या पण त्या त्यांना देण्यात आल्या नाही. त्यांना धमकवण्यात आलं. 2004 मध्ये याच जमिनी गडकरींनी स्वत:च्या प्रकल्पासाठी मागतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जमिनी गडकरींना देण्यासाठी मदत केली. याच जमिनावर गडकरींनी विदर्भात 5 वीज प्रकल्प आणि 3 साखर कारखानाने सुरू केले. या प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्यात, शेतीचे पाणी वळवण्यात आले. पाण्याचा वापर नीट व्हावा यासाठी धरणाला लागूनच गडकरींनी वीज प्रकल्प उभारला याचा पुरावा म्हणून केजरीवाल यांनी भर पत्रकार परिषदेत प्रकल्पाचा फोटो झळकावला. एवढेच नाही तर आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुनही त्यांनी राजकारण केलं. जेंव्हा सिंचन घोटाळ्यावरुन काँग्रेस -राष्ट्रवादीत आरोपसत्र सुरू होते या प्रकरणात गडकरींची पोलखोल होईल या भीतीने भाजप चूप बसली असा आरोपही केजरीवाल यांनी केला. त्याचबरोबर भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र केजरीवाल यांची प्रशंसा केली. फडणवीस चांगल काम करत आहे अशी पावती देऊ केली.

'जाको राके साईयां मार सके ना कोई'

कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी आज दिलेल्या धमकीचा केजरीवाल यांनी समाचार घेतला. जाको राके साईयां मार सके ना कोई, माझा मृत्यू देवाच्या हाती आहे त्यांनी आरोप करण्यापेक्षा नीट विचार करावा आणि मग बोलावे अन्यथा जनता त्यांना त्यांची जागा दाखवले असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.

कोणत्याही चौकशीला तयार – केजरीवाल

तसेच रॉबर्ट वडरा,सलमान खुर्शीद आणि नितिन गडकरींची चौकशी होणार की नाही हे सांगू शकत नाही पण आम्हाला लोकांसमोर त्यांचे काळा कारभार जनतेच्या समोर ठेवायाचा आहे. सगळेच पक्ष मिळून खात आहे आम्ही लोकांना जागृक करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आम्ही कोर्टात जाणार नाही आम्हाला लोकांसमोर सत्य मांडायचं आहे त्याबद्दल जनताच निवाडा करेल. याप्रकरणी मी, प्रशांत भूषण, अंजली दमानिया, मयांक गांधी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

गडकरींचे 'उद्योग'!

- पूर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या 8 कंपन्या- अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य: नितीन जयराम गडकरी- सर्वांत वेगवान गतीने वाढलेला उद्योग, अशी ओळख- 1995 : रिटेलर्स म्हणून उद्योगाची सुरुवात- 2000 : पूर्ती पॉवर ऍण्ड शुगर लिमिटेड हा सर्वांत मोठ्या कंपनीची सुरुवात- 12 वर्षांत विदर्भातल्या पहिल्या 10 साखर कारखान्यांमध्ये समावेश- पूर्ती शुगरची 200 एकर जागेवर 300 कोटींची उलाढाल- पूर्ती शुगरमध्ये होते मद्यनिर्मिती- महात्मा शुगर ऍण्ड पॉवर लि. हा आणखी एक साखर कारखाना- वैनगंगा शुगर ऍण्ड पॉवर लि.मध्ये साखर निर्मिती प्रस्तावित- यश ऍग्रो एनर्जीमध्ये ऊर्जा निर्मिती- अविनाश फ्युएल प्रा. लि. मध्ये इंधन आणि खनिजांचा व्यापार- इंडोनेशिया मध्ये कोळसा खाणींमध्ये उद्योगाची भरारी- पूर्ती सोलर सिस्टीम प्रा. लि. मध्ये सौर ऊर्जेची निर्मिती- पूर्ती ऍग्रोटेकमध्ये मसाला आणि धान्य उत्पादन- पूर्ती बेकरी आणि कन्फेक्शनरी उत्पादन- पूर्ती सुपर बझारमधून रिटेल उद्योगात पदापर्ण

close