आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात

October 16, 2012 11:14 AM0 commentsViews: 17

16 ऑगस्ट

शक्तीचं प्रतीक मानल्या जाणार्‍या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. घरोघरी आज घटस्थापना केली जातेय. आदिशक्तींचा महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरची रेणुका ही तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं. आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला महत्त्व दिलं गेलंय. कोकणातही नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. कुडाळच्या केळबाई देवीच्या मंदिरात आज घट बसवण्यात आले. मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये रुजत घालून त्यावर कलश ठेवून देवीची आराधना करण्याची प्रथा कोकणातल्या गावागावात आहे. शेतक-यांना संपन्नता लाभावी, आणि स्त्रीला अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी म्हणून नऊ रात्री देवीचा जागर केला जाणार आहे.

close