प्रेयसीवर सामुहिक बलात्कार करून खून

October 19, 2012 3:38 PM0 commentsViews: 7

19 ऑक्टोबर

सांगली जिल्ह्यातील विटा इथं झालेल्या अनुमिता चव्हाण खून प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 19 वर्षीय अनुमितावर तिच्याच प्रियकराने आपल्या तीन मित्रांसह सामुहिक बलात्कार करुन खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे या प्रकरणी पोलिसांनी अनुमिताच्या प्रियकरासह चार आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी लखन सरगर याच्याकडे अनुमिता लग्नासाठी मागे लागली होती. त्यामुळे त्याने आपल्या 3 मित्रांच्या मदतीने अनुमितावर सामुहिक बलात्कार केला आणि नंतर खून केला. पण याप्रकरणी पोलिसांनी आपल्यालाच मारहाण केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. गुन्हा कबूल करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही अनुमिताच्या वडिलांनी केला आहे.

close