यश चोप्रा यांना अखेरचा निरोप

October 22, 2012 11:43 AM0 commentsViews: 13

22 ऑक्टोबर

प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. विलेपार्ले इथल्या स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नांच्या या किमयागाराला अखेरचा निरोप देण्यासाठी अवघं बॉलिवूड लोटलं होतं. यश चोप्रांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळपासून बॉलिवूडच्या अनेक जणांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी अंत्यदर्शन घेतलं.. डेंग्यू झाल्यानं ते काही दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण काल संध्याकाळी त्यांचं निधन झालं.

यश चोप्रा यांचा जीवनप्रवास

close