अन् पायलटनं चुकून ‘प्लेन हायजॅक’ केलं

October 19, 2012 3:59 PM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर

काही तांत्रिक कारणामुळे अचानक एक विमान विमानतळावर उतरवलं जातं…यामुळे प्रवाशीही गोंधळून जातात..नेमकं झालं तरी काय…विमानतळावरील यंत्रणा सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास विनंती करते…पण याला प्रवासी नकार देतात आणि अचानक प्लेन हायजॅकचा अलार्म वाजू लागला..आणि एकच गोंधळ उडाला..'अरे डोंगराला आग लागली पळापळा'अशी अवस्था विमानतळावर होते…विमानाला काही क्षणातच पोलिसांचा गराडा…आरडाओरडा आणि कल्लोळ….पण पायलटने चुकून अलार्म वाजवल्याचं निष्पन झाल्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला…कोणत्याही सिनेमाला शोभावी अशी घटना तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर घडली. मात्र या थरारनाट्यानंतर अखेर विमानानं उड्डाण केलं. त्याचं झालं असं की, आज सकाळी तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर दुबई ते कोचीन एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 4422 काही तांत्रिक कारणांमुळे उतरवण्यात आलं. पण प्रवाशांनी विमानातून उतरण्यास नकार दिला. या सगळ्या गदारोळात पायलटनं चुकून हायजॅक अलार्म दाबला.आणि एकच गोंधळ उडाला आणि विमानतळावर भीतीचं वातावरण पसरलं. या घटनेची गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.

close