केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल दसर्‍यानंतर ?

October 17, 2012 2:50 PM0 commentsViews: 5

17 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांना आता दसर्‍यानंतरचा मुहूर्त मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण त्या संदर्भातला अंतिम निर्णय मात्र आजच होणार असल्याचं कळतंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्याआधी राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मंत्रीमंडळातील फेरबदलासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी कालच राष्ट्रपतींची वेगवेगळी भेट घेतली हेाती. तृणमूलच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्या जागी नवे चेहरे घेतले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

close