सावधान, मुंबईकरांनो डेंग्यू पसरतोय !

October 22, 2012 12:51 PM0 commentsViews: 99

22 ऑक्टोबर

मुंबईकरांनो सावधान व्हा, मुंबईत डेंग्यू आपले पाय पसरतोय.सरकारी आकड्यानुसार मुंबईत डेंग्यूचे 702 रुग्ण आहेत. पण यात शहरातल्या खासगी हॉस्पिटलमधल्या रुग्णांचा समावेश नाहीय. अशा रुग्णांची कोणतीच माहिती मुंबई महापालिकेकडे नाहीय. ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांचा डेंग्युमुळेच लीलावती हॉस्पिटल्समध्ये मृत्यू झाला. पण यश चोप्रांना डेंग्यू झाल्याची माहिती पालिकेकडे नव्हती. आता महापालिकेनं या घटनेची दखल घेत लीलावती हॉस्पिटलकडून यश चोप्रांचा डेथ रिपोर्ट मागवला आहे. अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी ही माहिती दिलीय. तसंच डेंग्यूच्या रुग्णांची तातडीनं माहिती देण्याचे आदेश महापालिकेनं खासगी हॉस्पिटलना दिलेत. पण अशा प्रकारचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचं खासगी हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे. यामुळे डेंग्यूचे नेमके रुग्ण किती आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातायत याबाबत गोंधळाची स्थिती आहे.

डेंग्यू ताप (हाडमोडी ताप)

डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा आजार इडास जातींच्या डासांमार्फत पसरतो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. संक्रमाणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (DHF). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो.

डेंग्यूची मुख्य लक्षणे

डेंग्यू ताप

एकदम जोराचा ताप चढणे डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणेडोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होतेस्नायू आणि सांध्यांमधे वेदनाचव आणि भूक नष्ट होणेछाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणेमळमळणे आणि उलट्या

डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ)

डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणेतीव्र, सतत पोटदुखीत्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणेनाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणेरक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणेझोप येणे आणि अस्वस्थतारुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडतेनाडी कमकुवतपणे जलद चालतेश्वास घेण्याला त्रास होणे

काय करावे काय करू नये

आठवड्यातून किमान एकदा कूलर्समधून आणि इतर लहान भांड्यामधून पाणी काढून टाकावेदिवसा डास चावू नयेत म्हणून एरोसोलचा वापर करावापाय आणि हात उघडे राहतील असे कपडे वापरु नकामुलांना लहान चड्ड्या आणि अर्धी बाही असलेल्या कपडे घालून खेळू देऊ नकादिवसा झोपतेवेळी मच्छरदाणी किंवा डास निवारक वापरावेत.साथीच्या काळात रुग्णांना मच्छरदाणीत आणि वेगळे ठेवणेमच्छरदाणी वापरून डासांचे चावे टाळणेडासरोधक मलम/ धूर यांचा वापर करून डासांना लांब ठेवणे.

- इडस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात इडस डास लवकर फैलावतात. यातले पाणी दर आठवडयाला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. साथीच्या काळात अशा पाण्याच्या जागा निचरा करून डासांची उत्पत्ती टाळणे हा महत्त्वाचा भाग आहे.

close