औरंगाबाद महापौरपदावरून युतीत धुसफूस

October 19, 2012 4:19 PM0 commentsViews: 3

19 ऑक्टोबर

औरंगाबादच्या महापौरपदावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हं दिसत आहे. 29 ऑक्टोबरला महापौरपदाची निवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपाला महापौरपद द्यावं अशी मागणी भाजपाने केली आहे. पण शिवसेनेचाच महापौर होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातली धूसफूस वाढलीय. एप्रिल 2009 पासून शिवसेना भाजप युतीची सत्ता औरंगाबाद महापालिकेमध्ये आहे. त्यात शिवसेनेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर अशी वाटणी केली आहे. अडीच वर्षाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या महापौरपदासाठी 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.

close