गडकरींवर आरोपानंतर शेतकरी बेपत्ता

October 18, 2012 9:41 AM0 commentsViews: 1

18 ऑक्टोबर

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ज्यांची जमीन घेतल्याचा आरोप आहे ते गजानन घाडगे गेल्या 48 तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कुठलीही माहिती नाही. घाडगे कुटुंबीय असुरक्षित असल्याची भीती, गजानन घाडगेंचे भाऊ विश्वनाथ घाडगे यांनी व्यक्त केलीय. तसंच गडकरींवर केलेले आरोप खरे आहेत, असा दावाही विश्वनाथ घाडगेंनी केला. आमची जमीन परत मिळावी हीच आमची मागणी आहे. असं आयबीएन-लोकमतशी बोलतांना विश्वनाथ घाडगे म्हणाले. बुधवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गडकरींवर जमिनी लाटल्याचा आरोप केला आहे.

close