दलित महिला हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

October 22, 2012 1:19 PM0 commentsViews: 7

22 ऑक्टोबर

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे राहणार्‍या दलित महिला हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अब्दुल बाकी अब्दुल करीम याला अखेर अटक करण्यात आली आहे. वसमत च्या रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. या प्रकरणातील इतर 2 जण फरार असून संशयित आरोपींच्या शोधासाठी 3 पोलीस पथकं रवाना केली झाली आहे.

16 ऑक्टोबरला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना माझ्या नावाने कर या मागणीसाठी मुख्य आरोपी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अब्दुल बाकी अब्दुल करीम यांने ट्रॅक्टरखाली चिरडण्याची धक्कादायक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडली. या प्रकरणी हिमायतनगर काँग्रेसच्या शहराध्यक्षासह इतर नऊ जणांविरूद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे अब्दुल बाकी अब्दुल करीम यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, याबाबतची तक्रार एका दिवसाआधी या महिलेने पोलीस स्टेशनकडे दिली होती. पण पोलिसांकडून या तक्रारीला दाद मिळाली नाही. परिणामी दुसर्‍या दिवशी ही महिला आपल्या घरी परतत असताना अब्दुल करीम यांनी तिला ट्रॅक्टरच्या धडकेने आधी खाली पाडलं आणि नंतर तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टर घातला आणि त्याखाली तिला चिरडलं. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन पोलीस कर्मचार्‍यांना निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी निलंबित केलं आहे.

close