पूर्ती ग्रुपमध्ये गडकरी ‘आयआरबी’ भागीदार – अजित सावंत

October 18, 2012 9:55 AM0 commentsViews: 7

18 ऑक्टोबर

पूर्ती ग्रुपमध्ये नितीन गडकरी आणि आयआरबी कंपनी भागीदार असल्याचा आरोप काँग्रेसचे निलंबित नेते अजित सावंत यांनी केला आहे. गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आयआरबी कंपनीला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट्स दिले. त्याबदल्यात आयआरबीनं गडकरींच्या पूर्ती ग्रुपचे शेअर्स खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सावंत यांनी केली. आमच्या 'आजचा सवाल' या विशेष कार्यक्रमात सावंत यांनी हा आरोप केलाय. तर भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आयआरबीला मिळालेले रस्ते कॉन्ट्रॅक्टस आणि पूर्ती ग्रुपमधील आयआरबीचे शेअर्स यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला.

close