मंत्रालयात राजकीय तर्कविर्तकाला उधाण

December 1, 2008 1:54 PM0 commentsViews: 1

1 डिसेंबर, मुंबईविनय म्हात्रेअतिरेक्यांनी बुधवारी रात्री मुंबईला टार्गेट केलं. सलग चार दिवस मुंबई दहशतीखाली होती. चारही दिवस मुंबईचे व्यवहार ठप्प होते. आज सोमवारपासून मुंबईचे व्यवहार सुरळीत झाले. मंत्रालयात आपली काम पूर्ण करुन घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मंत्रालयात प्रवेश पासासाठी लोक दोन तास रांगेत उभी होती. मात्र मंत्रालयाचं कामकाज पूर्णपणे थंड होतं. कारण सगळेच अधिकारी आणि कर्मचारी आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेत आज मंत्रालयाचं कामकाज पार पाडण्यापेक्षा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, याचा तर्क लावण्यातच अधिकारी आणि कर्मचारी गुंतले होते.

close