9 सिलिंडर देण्याबाबत सरकारचं तळ्यात मळ्यात

October 22, 2012 1:34 PM0 commentsViews: 27

22 ऑक्टोबर

महागाईत होरपाळणार्‍या जनतेला डिझेलच्या दरात वाढ आणि सिलिंडरमध्ये मर्यादा घालून सर्वसामान्यांचे पुरतं कंबरडं मोडलंय. चौहीबाजूने या दरवाढीचा निषेध करण्यात आला. एनडीएनं भारत बंदची आंदोलन करून काही आपला निषेध नोंदवला. याची दखल घेत काँग्रेसने ज्या राज्यात आपली सत्ता आहे तिथे जनतेला दिलासा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यात 6 ऐवजी 9 सिलेंडर देण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सवलतीच्या सिलिंडरच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत सरकारचं अजूनही तळ्यातमळ्यात आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांची एकदा बैठकसुद्धा झाली. पण याबाबतचा प्रस्ताव अजूनही आपल्यापर्यंत आलेलाच नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

close