किंगफिशर अखेर जमिनीवर; लायसन्स रद्द

October 20, 2012 11:23 AM0 commentsViews: 7

20 ऑक्टोबर

डबघाई आणि कर्जात बुडालेल्या 'किंगफिशर'चे अखेर पंख छाटण्यात आले आहे. आज हवाई वाहतूक महासंचालकांनी किंगफिशरला दणका दिला. किंगफिशर एअरलाईन्सचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. नवा आराखडा येईपर्यंत लायसन्स रद्द करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहे. किंगफिशरनं नोटीसला उत्तर न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून किंगफिशर विरुद्ध पायलट्सचा संघर्ष सुरु आहे. पगार न मिळाल्यामुळे कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे त्यामुळे किंगफिशरच्या उड्डाणवर याचा परिणाम झाला असून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीय. अगोदरच बँकांचं कर्ज आणि कर्मचार्‍यांच्या संपामुळे किंगफिशरचा पाय आणखी खोलात गेला आहे.

close