‘मराठवाड्याला हक्काचं पाणी द्या’

October 20, 2012 10:38 AM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

मराठवाड्याला हक्काचं पाणी द्या या मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेनं आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यासाठी नाशिक जिल्हयातील शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर आता मराठवाडयातही आंदोलन तीव्र होतं आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये 3 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर अहमदनगर आणि नाशिक जिल्हयातील धरणामध्ये 80 ते 100 टक्के इतका पाणीसाठा आहे. मराठवाडयाच्या वाट्याला येणारं पाणी अडवल्यानं हा प्रश्न निर्माण झाल्यानं आमच्या हक्काचं पाणी द्या या मागणीसाठी जनता विकास परिषदेनं धरणे आंदोलन सुरु केलंय.

close