दिग्विजय सिंग यांचे केजरीवालांना खुल्या चर्चेचं चॅलेंज

October 22, 2012 2:02 PM0 commentsViews: 4

22 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसमधल संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचं आव्हान देणार्‍या अरविंद केजरीवाल यांना दिग्विजय सिंग यांनी उत्तर दिलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आव्हान देण्यापेक्षा केजरीवाल यांनी आपल्याशी खुली चर्चा करावी असं प्रतिआव्हान दिग्विजय सिंग यांनी दिलं. दिग्विजय सिंग यांच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरं देईन, पण आधी काँग्रेसनं रॉबर्ट वडरा आणि पंतप्रधानांनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं होतं.

close