राहुल गांधींनीही स्वस्तात जमिनी लाटल्या -चौटाला

October 18, 2012 10:14 AM0 commentsViews: 3

18 ऑक्टोबर

फक्त रॉबर्ट वडराच नाही तर राहुल गांधी यांनीही हरियाणात जमिनी या बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घेतल्या असून त्या जमिनींची किंमत कमी दाखवून स्टँप ड्युटी चुकवल्याचा आरोप हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी केला. चौटाला यांनी या सर्व जमीन व्यवहारांमध्ये राहुल गांधी, रॉबर्ट वडरा आणि हरियाणातल्या काँग्रेस सरकारमध्ये साटंलोटं असल्याचाही आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी 2008 आणि 2009 या दोन वर्षात दीड लाख रूपये प्रति एकर या भावाने जमिनी घेतल्या आणि हा भाव बाजारभावापेक्षा 5 पटीने कमी होता असा दावा चौटालांनी केला आहे. या प्रकरणातील कागदपत्रांच्या प्रतीही चौटालांनी पत्रकार परिषदेत सादर केल्या… या सर्व प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी चौटालांनी केली. दरम्यान, राहुल गांधी यानी हे आरोप फेटाळून लावले आहे.

close