दसरा धमाका; चक्रव्यूह, अजब गजब लव्ह उद्या रिलीज

October 23, 2012 5:14 PM0 commentsViews: 5

23 ऑक्टोबर

दसर्‍याच्या निमित्तानं उद्या प्रकाश झा यांचा चक्रव्यूह रिलीज होतं आहे. अभय देओल, मनोज बाजपेयी, अर्जुन रामपाल, इशा गुप्ता यांचा अभिनय असलेला सिनेमा नक्षलवाद आणि सामाजिक अन्यायवर भाष्य करतो. तर दुसरा बॉलिवूडचा सिनेमा आहे धूम आणि धूम-2 यशस्वी दिग्दर्शक संजय गढवी यांचा अजब गजब लव्ह हा सिनेमा रिलीज होतं आहे. फालतू सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला जॅकी भगनानी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा एक रोमँटिक कॉमेडी आहे. मराठीवूडमध्ये 'श्री पार्टनर' सिनेमा रिलीज होतोय. वपुंच्या पार्टनर कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. दसर्‍याचं सेलिब्रेशन कुठला सिनेमा पाहून करायचं ते तुम्ही ठरवा.

close