अखेर किंगफिशरच्या कर्मचार्‍यांना मिळणार पगार

October 22, 2012 3:23 PM0 commentsViews: 10

22 ऑक्टोबर

जमिनीवर आलेल्या किंगफिशर एअर लाईन्सनं आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी तीन महिन्यांचा पगार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या कर्मचार्‍यांना 24 तासांत एका महिन्याचा पगार देण्याचा, दुसर्‍या महिन्याचा पगार एका आठवड्यात तर तिसर्‍या महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी देऊ असं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पण या प्रस्तावावर किंगफिशरचे कर्मचारी नाखूश आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून कर्मचारी आणि पायलटना पगार मिळालेला नाही. दरम्यान, किंगफिशरला भाड्यानं मिळालेल्या 15 विमानांचे महत्त्वाचे पार्ट्स संबंधित कंपन्यांनी काढून घेतलेत. त्यामुळे ही विमानं आता उड्डाण करू शकणार नाहीत.

close