धुळ्यात राष्ट्रवादी तर अहमदनगरमध्ये युतीचा विजय

December 1, 2008 2:07 PM0 commentsViews: 3

1 डिसेंबर, धुळे धुळे आणि अहमदनगर महापालिकेचे निकाल आज जाहीर झाले. धुळ्यात राष्ट्रवादीनं तर अहमदनगरमध्ये युतीनं बाजी मारली. धुळ्यात राष्ट्रवादी कॉग्रेसनं सर्वात जास्त म्हणजे 24 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेनं 16 जागा जिंकल्यात तर भाजपनं 3 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलंय.अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला 8 जागा मिळाल्यात तर अपक्षांनी 12 जागेवर विजय मिळवलाय.बसपलाही 1 जागा मिळाली आहे.अहमदनगरमध्ये 65 जागेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल लागले असून भाजप-सेना युतीनं 30 जागा जिंकत सत्तेवरचा आपला दावा मजबूत केलाय. यात सेनेला 18 तर भाजपला 12 जागा मिळाल्यात. कॉग्रेस-राष्ट्रवादी युतीने 23 जागा जिंकल्यात. अपक्षांनी 8 जागा पटकावल्यात तर बसप आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळालीय. मनसेनं दोन जागा पटकावल्यात तर एक जागा बिनविरोध निवडणूक झाली.

close