डी.पी शिर्केंना हवंय मेरीचं महासंचालकपद

October 18, 2012 10:44 AM0 commentsViews: 6

18 ऑक्टोबर

विदर्भ सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या व्हीआयडीसी (VIDC)चे त्तकालीन कार्यकारी संचालक डी.पी.शिर्के यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदावरून दूर केलं. पण आपली मेरीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती डी.पी शिर्के यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय. शिर्के यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव येत असल्याचं कळतंय. आधीच गेल्या 6 ऑक्टोबरपासून शिर्के यांची विभागीय चौकशी सुरू झालीय. असं असतानाही त्यांची उच्च पदावर वर्णी लावण्याचा घाट घातला जातोय.

close